Skip to main content

यूपीएससीची तयारी : संवादकौशल्याची कसोटी

यूपीएससीची तयारी : संवादकौशल्याची कसोटी

तुकाराम जाधव 

मागील लेखात मुलाखतीच्या तयारीचा आशयात्मक अंगाने विचार केला होता. आजच्या लेखात तिच्या अभिव्यक्ती आणि संवादात्मक आयामाची चर्चा करणार आहोत. मुळात मुलाखत ही तोंडी स्वरूपाची परीक्षा असल्याने येथे संभाषण, भाषिक अभिव्यक्ती हे माध्यम निर्णायक ठरते. संवादकौशल्य अथवा क्षमतेचा ढोबळ अर्थ लक्षात घ्यायचा म्हटले तरी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांच्या बाबतीत आपल्याला जे वाटते ते अपेक्षित पद्धतीने मुलाखत मंडळासमोर प्रभावीपणे मांडणे ही कला महत्त्वाची ठरते. उत्तराच्या अभिव्यक्तीमध्ये भाषेच्या विविध अंगांपासून आपल्या बोलण्याच्या/व्यक्त होण्याच्या पद्धतीपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होतो.
मागील चच्रेत म्हटल्याप्रमाणे एका अर्थी मुलाखत म्हणजे स्वत:चे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे मुलाखत मंडळासमोर सादर करणे होय. या प्रक्रियेची सुरुवात मुलाखतीच्या कक्षात प्रवेश करण्यापासून होते. मुलाखत मंडळाच्या परवानगीने कक्षात प्रवेश करणे, त्यांना अभिवादन करणे आणि त्यांच्या परवानगीनेच खुर्चीत विराजमान होणे. या प्रारंभिक बाबींपासूनच संवादप्रक्रियेची आत्मविश्वासपूर्वक सुरुवात करणे आवश्यक ठरते.
प्रत्यक्ष मुलाखत सुरू झाल्यानंतर विचारलेले प्रश्न काळजीपूर्वक ऐकणे गरजेचे ठरते. सदस्य प्रश्न विचारत असताना आपल्या चेहऱ्यावर अनावश्यक ताण येणार नाही अथवा आपल्या शरीराच्या (विशेषत: बोटे, हात आणि पाय) विचित्र हालचाली होणार नाहीत याची काळजी घ्यावी. केवळ प्रश्न ऐकतानाच नाही तर संपूर्ण मुलाखतीत आपली देहबोली औपचारिक, संयत व सकारात्मक असावी. बरेचदा आपल्या मनात चाललेले विचार चेहऱ्यावर प्रतििबबित होण्याची शक्यता असते. तसे होऊ न देता कोणत्याही स्थितीत आपल्या चेहऱ्यावर शांत व संयत भाव राहतील याची काळजी घ्यावी.
संपूर्ण मुलाखतीच्या प्रक्रियेत सर्वच सदस्यांना संबोधित करत, प्रत्येक सदस्याकडे पाहात उत्तरे देणे आत्मविश्वासाचे लक्षण मानले जाते. शिवाय त्याद्वारे सर्वच सदस्यांना आपल्या संवादात सामावून घेऊन त्यांनाही त्यात रस निर्माण करण्यात यश मिळवता येते. अन्यथा केवळ प्रश्न विचारलेल्या सदस्याकडे पाहूनच अथवा एकाच सदस्याकडे पाहून उत्तरे दिल्यास इतर सदस्यांचा मुलाखतीतील रस कमी होऊ शकतो, हे लक्षात घ्यावे.
आपल्या उत्तराची भाषा, त्यातील शब्द, वाक्यरचना औपचारिक स्वरूपाचीच असावी. विनाकारण क्लिष्ट शब्दांचा वापर करू नये. अपेक्षित तेथे समर्पक संकल्पनात्मक शब्दप्रयोगाचा वापर जरूर करावा. संवादाची भाषा औपचारिक अपेक्षित असली तरी ती पुस्तकी, बोजड असू नये. सुलभ-सोपी भाषा हे तत्त्व मुलाखतीतही आचरण्यास हरकत नाही. इतर कोणाचाही उल्लेख करताना अपशब्द वापरला जाणार नाही याची काळजी घ्यावी. कोणाचाही उल्लेख आदरपूर्वकच केला जावा.
उमेदवाराच्या आवाजाची पातळी मुलाखत मंडळास पुरेशी ऐकू जाईल अशा स्वरूपाची असावी. आवाज व भाषेत स्पष्टता हवी. आवश्यक तेथे आवश्यक तेव्हा आशयानुरूप पातळीत चढ-उतार करायला हरकत नाही. बसण्याची पद्धत, चेहऱ्यावरील हालचाली, हावभाव ताठर स्वरूपाचे असू नयेत. संवाद साधताना औपचारिकता पाळावयाची असली तरी तुमच्या एकंदर अभिव्यक्तीत मोकळेपणा व सहजताही आवश्यक ठरते. त्या दृष्टीने प्रसंगानुरूप चेहऱ्यावर स्मितहास्य आणणे उपयुक्त ठरते.
मुलाखतीच्या संवादप्रक्रियेत स्वाभाविकत: टिकवून ठेवणे हे एक मोठे आव्हान असले तरी अगत्याचे ठरते. साचेबद्ध, तयार केलेली उत्तरे जशीच्या तशी मांडण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे मुलाखतप्रक्रिया यांत्रिक बनून त्यातील स्वाभाविकताच नष्ट होऊ शकते. त्यामुळे आधीच तयार केलेल्या विषयासंबंधी अपेक्षित प्रश्न विचारला तरी आपण तसे जाणवू न देता काही सेकंदांचा विराम घेऊन विचारपूर्वक उत्तर देत आहोत हे पाहावे. उत्तराचा एकच एक ‘फॉरमॅट’ बनवून साचेबद्ध उत्तरे देण्याचे कटाक्षाने टाळावे. आपल्या प्रतिसादात विविधता आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा.
संवादकौशल्याची आणखी एक महत्त्वपूर्ण बाजू म्हणजे आपल्या अभिव्यक्तीतील सभ्यता व संयतता होय. बऱ्याच वेळा मुलाखतीत किमान काही मुद्दय़ांसंबंधी चिकित्सक स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. अशा वेळी संबंधित मुद्दय़ावर टीका करताना अथवा त्यातील दोष-कमतरतांचे अधोरेखन करताना आपली भाषा संयत, सभ्य व विधायकच हवी, हे लक्षात घ्यावे.
संपूर्ण मुलाखतीदरम्यान आपले भावनिक, मानसिक आणि वैचारिक संतुलन टिकवून ठेवणेही गरजेचे असते. काही मुद्दय़ांच्या बाबतीत आपण अतिसंवेदनशील, भावनिक होऊन अभिव्यक्त होण्याची शक्यता असते. अथवा काही बाबतीत अतिरिक्त प्रमाणात कठोरही बनण्याची शक्यता असते. ही बाब आपण वापरत असलेली भाषा, आपल्या आवाजाची पातळी आणि देहबोली यातून व्यक्त होऊ शकते. त्यामुळे ही दोन्ही टोके टाळून आपल्या भावनिक व्यक्तिमत्त्वातील समतोल शेवटपर्यंत टिकवून ठेवणे हे एक आव्हानच ठरते.
मुलाखतीदरम्यान काही संकेत कटाक्षाने पाळावेत. सदस्यांना प्रवेश करताना व मुलाखत संपल्यावर अभिवादन करणे, काही चुकल्यास दिलगिरी व्यक्त करणे, मंडळाने उत्तराच्या बाबतीत मदत केल्यास वा काही सुचविल्यास त्यांना धन्यवाद देणे, सर्वाना संबोधत सर्वाकडे पाहून बोलणे, प्रश्न विचारून झाल्यावर तात्काळ उत्तर न देता काही सेकंदांच्या विश्रामानंतर उत्तर द्यावयास सुरुवात करणे, सदस्याने आपण उत्तर देताना मध्येच अडवून प्रश्न-उपप्रश्न विचारल्यास त्यांचा प्रश्न ऐकून घेऊन मगच उत्तर देणे, माहीत नसल्यास तसे स्पष्टपणे सांगणे अथवा त्याबाबत अंदाज व्यक्त करायचा असल्यास मंडळाच्या परवानगीनेच तसे करणे, प्रामाणिकपणाचे पालन करणे, मंडळाशी दुमत अथवा मतभेद झाल्यास अत्यंत संयमी व संयतपणे भूमिका मांडणे यांसारख्या संकेताचे जरूर पालन करावे. उपरोक्त चíचलेल्या विविध अंगांचा विकास करण्यासाठी अर्थातच गरज आहे ती भरपूर सरावाची. Mock Interview  च्या माध्यमातून आपल्या अभिव्यक्ती व संवादक्षमतेचा विकास करण्यावर भर दिल्यास या कौशल्याची हमी देता येईल, हे नक्की!

Comments

Popular posts from this blog

UPSC To Implement Changes in Civil Services Exam Pattern 2018 | Here’s All You Need To Know

The Union Public Service Commission (UPSC) is in talks to bring about some major changes in the exam pattern of the Civil Services Examination conducted every year. Changes to bring about in the UPSC Civil Services Examination were being proposed from quite a while now. Lately, the UPSC had made an expert committee in order to review the exam pattern of the Civil Services Examination conducted by the UPSC back in August 2015. Baswan Committee Recommends Changes In UPSC Exam Pattern The Baswan Committee is keen on bringing about certain changes in the UPSC Civil Services Exam Pattern. The Civil Services Examination which is conducted every year in order to recruit the top level bureaucrats to work with the Indian Administration. The UPSC conducted Civil Services Exam is one of the most privileged and toughest Exams conducted in the country. The Baswan Committee has recommended changes in the UPSC Civil Services Exam. A report suggesting the various changes in the UPSC Civil Services E

Several myths surround the UPSC examination, but here is what you need to do to succeed.

              The Union Public Service Commission (UPSC) is the central authority that conducts various examinations to recruit candidates for various government services such as civil services, engineering services, defence services and so on. The civil services, however, have always had an added allure. Hence, the selection process is much more competitive. Let us first try to understand the importance of civil services in a democracy such as India. For effective administration, it is vital that our political leaders are given non-partisan advice. Effective co-ordination is required between the various institutions of governance. Policy-making must be effective and regulated and able leaders are required at every level of administration. In addition to this, civil services executives must offer free, frank and unbiased advice to the government (irrespective of who is in power) to fulfil their responsibility to the public who elected the government. Different options Given t

UPSC Releases Civil Services (IAS) 2017 Notification for 980 Vacancies, Apply at upsconline.nic.in

UPSC Releases Civil Services (IAS) 2017 Notification for 980 Vacancies, Apply at upsconline.nic.in UPSC Civil Services (IAS) Exam 2017 Notification: Union Public Service Commission (UPSC) released the UPSC Civil Services IAS Exam 2017 notification for recruitment on 980 posts of Indian nationals in Indian Civil Services under various departments. UPSC invited applications from the candidates who are eligible and willing to join the civil services. Interested and eligible candidates can apply for the UPSC Civil Services IAS Exam 2016 through the prescribed format on or before 17 March 2017. To apply for IAS Exam 2016, the candidate must hold a degree of any of Universities incorporated by an Act of the Central or State Legislature in India or other educational institutions established by an Act of Parliament or declared to be deemed as a University under Section-3 of the University Grants Commission Act, 1956, or possess an equivalent qualification. Vacancy Details for UPSC Civil Serv