Skip to main content

प्रस्तुत लेखमालेतून सामान्य अध्ययन पेपर-३ मधील अभ्यासघटकांवर आधारित समकालीन मुद्यांची चर्चा करणार आहोत


प्रस्तुत लेखमालेतून सामान्य अध्ययन पेपर-३ मधील अभ्यासघटकांवर आधारित समकालीन मुद्यांची चर्चा करणार आहोत.
सहस्त्रक विकास लक्ष्याची (MDGs) यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर जगभरातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९३ सदस्य देशांनी २०१५नंतरचा विकासाचा नवीन अजेंडा शाश्वत विकास लक्ष्यांच्या स्वरूपामध्ये तयार केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या (Open Working Group – COWG)ने या संदर्भात बंधनकारक असणाऱ्या दस्तावेजाची (Outcome Document) निर्मिती केली. या दस्तावेजाचे शीर्षक ” The future we want” असे आहे. जून २०१२मध्ये पार पडलेल्या Rio+20 परिषदेनंतर जुल २०१४ मध्ये १७कलमी SDGs ची निर्मिती करण्यात आली. शाश्वत विकासाशी संबंधित आर्थिक विकास, सामाजिक समावेशन व पर्यावरण संरक्षण आदी मुद्यांवर यामध्ये भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे SDGs ची यशस्वी पूर्तता करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शाश्वत विकास लक्ष्ये (SDGs) वैश्विक पातळीवर लागू होणारी आहेत. या लक्ष्याची निर्मिती करताना प्रत्येक राष्ट्राची वास्तविकता, क्षमता, विकासाची पातळी, त्याच्या राष्ट्रीय धोरणांना व प्राधान्यांना विचारात घेतले आहे. ही लक्ष्ये परस्परांशी निगडित असल्याने त्यांची अंमलबजावणी एकात्मिक पद्धतीने करणे आवश्यक ठरते. शाश्वत उद्दिष्टे तीन वष्रे चाललेल्या संबंधित भागधारक व लोकांच्या पारदर्शक व सहभागात्मक प्रक्रियेचा परिणाम आहेत. २५ सप्टेंबर २०१५ ला पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास परिषदेच्या शेवटी जगभरातील नेत्यांनी २०३०शाश्वत विकासाचा अजेंडा स्वीकारला. या अजेंडय़ातील १७ उद्दिष्टय़े पुढीलप्रमाणे –
१)     सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.
२)     भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.
३)     आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.
४)     सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.
५)     लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.
६)     पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.
७)     सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.
८)     शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.
९)     पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.
१०)    विविध देशांमधील असमानता दूर करणे.
११)    शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.
१२)    उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.
१३)    हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.
१४)    महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.
१५)    परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.
१६)    शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.
१७)    चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.
१७ लक्ष्ये व १६९ उद्दिष्टांसह SDGs ची व्याप्ती अधिक आहे. यामध्ये शाश्वत विकासाचे महत्त्वपूर्ण आयाम असणाऱ्या आíथक विकास, सामाजिक समावेशन व पर्यावरण संवर्धन यांचा अंतर्भाव होतो. S MDGs च्या यशस्वी अंमलबजावणीच्या पाश्र्वभूमीवर ह्य़ा नवीन जागतिक SDGs द्वारे विषमता, आíथक वाढ, रोजगार, शहरे व मानवी वस्त्या, औद्योगिकीकरण, ऊर्जा, हवामान बदल, शांतता व न्याय या बाबींचे समाधान होणे अपेक्षित आहे. SDGsवैश्विक आहेत, जगातील सर्व देशांना लागू असल्याने MDGs पेक्षा ते अधिक सर्वसमावेशक आहेत. MDGs ची व्याप्ती विकसनशील देशापुरती मर्यादित होती.

Comments

Popular posts from this blog

स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.............

स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी- प्रकरण 1..... स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे. माझा तुम्हाला सल्ला आहे... हा महत्वाचा निर्णय स्वतः घेऊ नका. तुमच्या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली आहे वा क्लासेस केले आहेत, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा. तुमच्या आयुष्याचा आणि पैशांचा प्रश्न आहे, त्यामुळे गडबड न करत सगळ्या क्लासेसला भेट द्या आणि मगच निर्णय घ्या.... आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे..... १. निकालामागचे गौडबंगाल....... याच पेज वरची माझी ६ मे ची पोस्ट बघावी.. २. शिक्षक..... क्लास का लावायचा असतो? शिकण्यासाठी.... शिकवते कोण? शिक्षक... त्यामुळे क्लास लावायचा असेल तर सगळ्यात मह्त्वाची कोणती बाब बघावी? शिक्षक कोण आहेत.... सामान्यतः क्लासेस मध्ये तुम्हाला खालील भूमिका पार पडणाऱ्या व्यक्ती भेटलीत... अ. संचालक / क्लासप्रमुख- ...

upsc

UPSC Civil Services: FAQs about the preliminary exam

from old blog/post- For a candidate belonging to SC/ST category: Unlimited (there is no restriction on number of attempts for SC/ST category). Q. Can the IAS exam be cleared without taking coaching? There have been many instances where candidates have cleared the exam without actually taking any coaching and spending sleepless nights. But still, this varies from person to person. If you are disciplined enough with your schedule and won't get distracted at home, self-studying may yield a good result. On the other hand, taking a coaching will help you interact with fellow students, discuss problems and get your doubts cleared by the professor on the spot. Q. What is the structure of UPSC Civil Service prelims exam? Paper-I- General Studies - This paper will be counted for qualifying to write the Civil Services Mains exam. Paper- II (CSAT)- Aptitude test (CSAT) - This paper is of qualifying nature, but candidate must score at least 33 per cent marks in this paper. However, ...