स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी- प्रकरण 1..... स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे. माझा तुम्हाला सल्ला आहे... हा महत्वाचा निर्णय स्वतः घेऊ नका. तुमच्या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली आहे वा क्लासेस केले आहेत, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा. तुमच्या आयुष्याचा आणि पैशांचा प्रश्न आहे, त्यामुळे गडबड न करत सगळ्या क्लासेसला भेट द्या आणि मगच निर्णय घ्या.... आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे..... १. निकालामागचे गौडबंगाल....... याच पेज वरची माझी ६ मे ची पोस्ट बघावी.. २. शिक्षक..... क्लास का लावायचा असतो? शिकण्यासाठी.... शिकवते कोण? शिक्षक... त्यामुळे क्लास लावायचा असेल तर सगळ्यात मह्त्वाची कोणती बाब बघावी? शिक्षक कोण आहेत.... सामान्यतः क्लासेस मध्ये तुम्हाला खालील भूमिका पार पडणाऱ्या व्यक्ती भेटलीत... अ. संचालक / क्लासप्रमुख- ...
स्पर्धा परीक्षा माहिती.
Comments
Post a Comment